नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीने सरकारी नोकरीच्या आमिषाने घातला 9 लाखांचा गंडा, मुंबई गुन्हा दाखल
महाराष्ट्र राजकारण: सरकारी नोकरीचे आमीष दाखवून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे ओएसडी (OSD) राहिलेल्या एका अधिकार्याने 9 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. रत्नागिरीला राहणार्या विशाखा बनप यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा माहिम पोलीस ठाण्यात नोंदवणयात आला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार सचिन चिखलीकर (Sachin Chikhalikar) हे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांचे ओएसडी असून त्यांनी ही फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी माहिम पोलीस (Mahim Police) ठाण्यात सचिन चिखलीकरसह चारूदत्त तांबे, तेजस तांबे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असल्याचे ही बोललं जात आहे.
कृषी खात्यात नोकरीला लावतो, 14 लाखांची मागणी
पुढे आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये चिखलीकर जिल्हा नियोजन बैठकिला रत्नागिरीला आले असताना रत्नागिरीला राहणार्या विशाखा बनप यांनी सरकारी नोकरीबाबत विचारताच चिखलीकर यानी 2 लाखांची ऑफर केली. पैसे देताच चिखलीकर यांनी बनप यांची चारूदत्त तांबे यांच्याशी ओळख करून दिली. मात्र आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने बनप यांनी चिखलीकर यांच्याकडे पैसै मागितले. त्यावर उत्तर देताना ते पैसे तांबेला दिल्याचे चिखलीकर यांनी सा़गितले. त्यानंतर तांबे याने रेल्वेत लिपीक पदावर नोकरीला लावून देण्याचे आश्वासन दिले. मात्र तीही परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली असल्याचे तांबे यांनी सांगितले. त्यानंतर कृषी खात्यात नोकरीला लावतो, असे सांगण्यात आले. त्यासाठी आणखी 14 लाखांची मागणी करण्यात आली.
सचिन चिखलीकरांविरोधात या पूर्वीही अनेक तक्रारी
दरम्यान, सप्टेंबर 2023मध्ये लिपीक पदाची परीक्षाही झाली. मात्र निकालात आपल्या मुलाचे नाव नसल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बनप यांच्या लक्षात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाखा बनप यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि या प्रकरणी तक्रार दिली. तक्रारीनंतर माहीम पोलिसांनी या प्रकरणी सचिन चिखलीकर, चारूदत्त तांबे, तेजस तांबे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तर दुसरीकडे चिखलीकर यांच्या विरोधात नेत्यांचे OSD असताना अनेक तक्रारी आल्याने त्यांना हटवण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे आणखी काही प्रकरणे उजेडात येतात का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.