नमाज पठणला विरोध, मग शनिवार वाड्यातील मस्तानी दरवाजामुळे तुमच्या भावना दुखत नाही का? रिपाइंच्या
सचिन खरात मेधा कुलकर्णी: शनिवारवाड्यात (Shaniwar Wada) महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. शनिवारवाड्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) प्रचंड आक्रमक झाल्या. पतीत पावन संघटना व मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसेच या परिसरात गोमुत्रही शिंपडण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्याने पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाची देखील झाली होती. यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट पक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधलाय.
सचिन खरात म्हणाले की, पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ ट्विट केल्याचे समजत आहे. या व्हिडिओमध्ये शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भावना देखील दुखावल्या असे त्यांचे मत आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी काल शनिवार वाड्यासमोर आंदोलन केले. परंतु खासदार मेधा कुलकर्णी यांना आम्ही सांगू इच्छितो की, शनिवार वाडा हे काही धार्मिक स्थळ नाही. शनिवार वाडा हे पर्यटन स्थळ आहे. भारतातील कोणीही व्यक्ती तेथे जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.
Sachin Kharat Medha Kulkarni: प्रेम बिराडेचा मुद्दा संपवण्यासाठीच हा विषय काढला
पुण्यामध्ये मॉर्डन कॉलेजच्या एका बौद्ध विद्यार्थ्याला लंडनमध्ये नोकरी लागली होती. त्याला सर्टिफिकेट न दिल्याने नोकरी मिळाली नाही, असा आरोप प्रेम बिराडे नामक विद्यार्थ्याने केला आहे. याबद्दल आपण कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण जाणीवपूर्वक संपवण्यासाठीच त्यांनी शनिवार वाड्याचा मुद्दा समोर आणलाय, असा आरोप सचिन खरात यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर केलाय.
Sachin Kharat Medha Kulkarni: मस्तानी दरवाजामुळे तुमच्या भावना दुखत नाही का?
सचिन खरात पुढे म्हणाले की, त्या सतत हिंदू-मुसलमान वाद करताना दिसत आहेत. शनिवार वाड्यात मस्तानी दरवाजा आहे. नमाज पठणामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर शनिवार वाड्यात मस्तानी दरवाजा आहे. त्यामुळे तुमच्या भावना दुखत नाही का? आता या मस्तानी दरवाजाचे काय करणार? बाजीराव आणि मस्तानी यांना शमशेर नावाचा मुलगा होता, मग तुम्हाला बाजीराव चालतात मग शमशेरबद्दल तुमचं मत काय? असा सवाल त्यांनी मेधा कुलकर्णी यांना विचारला. आता सचिन खरात यांच्या टीकेवर मेधा कुलकर्णी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.