रघुवंशींच्या घरात पुन्हा गोंधळ; महिलेने राजाच्या भावावर केले गंभीर आरोप; डीएनए रिपोर्ट दाखवत म्
इंडोर: मेघालयमधील हनीमून मर्डर केसमुळे चर्चेत आलेलं रघुवंशी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मृत राजा रघुवंशीच्या मोठ्या भावाविरुद्ध एका महिलेने खळबळजनक दावा करत म्हटलंय की, “सचिन रघुवंशी हा माझ्या मुलाचा वडील आहे.” विशेष म्हणजे या दाव्याच्या समर्थनार्थ संबंधित महिलेने डीएनए अहवालदेखील सादर केला आहे. 1 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत या महिलेने सांगितलं की, “डीएनए टेस्टद्वारे सिद्ध झालंय की सचिन रघुवंशीच माझ्या मुलाचा बाप आहे.” एवढंच नव्हे, तर तिने राजा रघुवंशीच्या भावासोबत म्हणजेच सचिनसोबत मंदिरात विधिवत विवाह केल्याचा दावा केला असून त्या विवाहाचे व्हिडिओ आणि फोटोदेखील पत्रकार परिषदेत दाखवले.
रघुवंशी कुटुंबाला उत्तर द्यावे लागेल
राजा रघुवंशीचा भाऊ सचिन रघुवंशीच्या कथित पत्नीने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाचा डीएनए अहवाल माध्यमांसमोर सादर केला आहे, ज्यामध्ये हे मूल सचिनचेच असल्याचे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी माध्यमांसमोर बोलताना ही महिला भावुक झाली आणि म्हणाली की आता डीएनए अहवाल आल्यानंतर रघुवंशी कुटुंबाला उत्तर द्यावे लागेल. माझ्या मुलाला जाणूनबुजून नाकारण्यात आले. हा केवळ माझाच नाही तर माझ्या मुलाचाही अपमान आहे. महिलेने दावा केला की तिच्याकडे लग्नाचे व्हिडिओ, फोटो आणि मंदिरात केल्या जाणाऱ्या विधींचे संपूर्ण पुरावे आहेत. तिने हा व्हिडिओ माध्यमांना दाखवला.
सचिनने वेळेवर आमचं नातं स्वीकारलं असतं, तर….
महिलेला यावेळी अश्रू अनावर झाले, तिने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, “माझ्या मुलाला मुद्दाम नाकारण्यात आलं. हा माझा आणि माझ्या मुलाचा अपमान आहे. आज माझ्या बाळाची अशी अवस्था झाली आहे. सचिनला आता उत्तर द्यावंच लागेल.” महिलेने असंही म्हटलं की, “जर सचिनने वेळेवर आमचं नातं स्वीकारलं असतं, तर आज हा अपमान झाला नसता.” तिच्या म्हणण्यानुसार, तीने अनेक वेळा न्यायासाठी प्रयत्न केले, पण रघुवंशी कुटुंबाने तिची सतत उपेक्षा केली. त्यामुळे आता तिने आपल्याला आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. “मला विश्वास आहे की हायकोर्टातून मला नक्कीच न्याय मिळेल,” असं तिने ठामपणे सांगितलं. सध्या सचिन रघुवंशीविरोधात करण्यात आलेल्या या नव्या आरोपामुळे रघुवंशी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून, याप्रकरणाची कायदेशीर लढाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजा रघुवंशीच्या मृत्यूने खळबळ
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीच्या मृत्यूने आधीच खळबळ उडाली होती. त्याचा विवाह 11 मे रोजी सोनम रघुवंशीसोबत झाला होता. 20 मे रोजी दोघं हनीमूनसाठी गेले होते. 23 मेपासून ते दोघं बेपत्ता होते. 2 जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयमधील शिलाँग येथील दरीमध्ये आढळून आला होता, तर 9 जूनला सोनमला उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.
आणखी वाचा
Comments are closed.