अर्जुनच्या साखरपुड्यावर सचिन तेंडुलकरचा खुलासा, म्हणाला आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी खूप उत्सुक……
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी अखेर आपल्या मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. याआधीपासूनच अर्जुनने सानिया चांडोकसोबत साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र सचिन आणि त्यांच्या कुटुंबाने मौन पाळल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या अटकळींना उधाण आले होते.
रेडिटवरील Ask Me Anything (AMA) सत्रादरम्यान एका चाहत्याने सचिनला विचारले, “अर्जुनने खरोखरच साखरपुडा केला का?” यावर सचिनने हसत उत्तर दिले, “हो, केला आहे आणि आम्ही सगळेच त्याच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी खूप उत्सुक आहोत.”
सचिन तेंडुलकर यांनी आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी सॅनिया चांदोकशी झालेल्या गुंतवणूकीची पुष्टी केली आहे.#सॅचिंटेन्डलकर #Arjuntendulkar pic.twitter.com/jjcxwq46n7
– क्रिकेटचे मंडळ (@सिरक्लोफक्रिकेट) 25 ऑगस्ट, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन व सानियाचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडला. या समारंभाला फक्त नातेवाईक आणि जिवलग मित्रच उपस्थित होते. सानियाचे आजोबा रवि घई हे नामांकित उद्योगपती असून त्यांचा इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल व ब्रुकलिन क्रीमरी या आइसक्रीम ब्रँडशी संबंध आहे. सानिया स्वतः Mr. Paws Pet Spa & Store LLP या कंपनीची डायरेक्टर आहे.
अर्जुन तेंडूलकर (25) सध्या गोव्याच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र 2025च्या हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळता आले नाही. त्याने 17 प्रथमश्रेणी सामन्यांत 37 बळी घेतले असून 532 धावाही केल्या आहेत. 2020 मध्ये राजस्थानविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने पदार्पणातच शतक ठोकले होते.
सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने नुकतेच मुंबईत पिलाटेस स्टुडिओ सुरू केले असून, अर्जुनची पत्नी सानियाही या उद्घाटनाला उपस्थित होती.
रेडिट सत्रात चाहत्यांनी सचिनला मुलांना दिलेल्या जीवनमंत्राबाबत विचारले असता तो म्हणाला, “स्वप्नांचा पाठलाग करा, तेव्हाच ती वास्तवात उतरतात. मी तेच आयुष्यात केले आणि अर्जुन व सारालाही तेच सांगितले. क्रिकेटप्रमाणेच आयुष्यातही प्रक्रियेवर विश्वास ठेवला, तर परिणाम आपोआप मिळतात.”
सचिनच्या या मनमोकळ्या संवादातून चाहत्यांना त्याच्या कुटुंबाबद्दल, प्रवासाच्या सवयींबद्दल आणि निवृत्तीनंतरच्या साध्या जीवनशैलीबद्दल नव्या गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळाली.
Comments are closed.