आपली लढाई राजारामबापूंच्या वारसाबरोबर, पडळकरांनी असं बोलायला नको होतं, सदाभाऊ खोतांची प्रतिक्रि
सदाभौ खत: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalka) यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. यावर पडळकरांचे मित्र आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं, असे खोत यांनी म्हटलं आहे. आपली लढाई राजारामबापू यांच्याबरोबर नाही तर त्यांच्या वारसांबरोबर असल्याचे खोत म्हणाले.
जाती- पातीचे बी शोधण्याचे पेटंट शरद पवारांकडे, खोतांचा टोला
आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलेला त्रास सर्वांनाच माहित आहे. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा नेता म्हणून गोपीचंद यांना त्रास दिला जात असल्याचे खोत म्हणाले. आमदार गोपीचंद पडळकर हे लंबी रेस का घोडा आहेत असंही खोत म्हणाले. जाती- पातीचे बी शोधण्याचे पेटंट शरद पवार यांच्याकडे जातं. त्यांनीच जाती- जातीमध्ये दरी निर्माण करण्याचं काम केलं, असा खोचक टोला देखील त्यांनी पवारांना लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कधीच कोणत्याही भाजप नेत्याला अशा पद्धतीने बोलण्यास सांगितले नाही असेही खोत यावेळी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
जयंत पाटील हे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेते. राज्यातील विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. सांगलीतील राजकारणावरही त्यांचे एकेकाळी वर्चस्व. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र जयंत पाटलांच्या वर्चस्वाला हादरा बसला. त्याचवेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचा वाद मात्र वाढला. तो इतका वाढला की, गोपीचंद पडळकरांनी पातळी सोडून त्यांच्यावर टीका केली. जयंत पाटील हा बिनडोक माणूस, त्याला काही अक्कल नाही अशा शेलक्या शब्दात पडळकरांनी जयंत पाटलांचा समाचार घेतला. मात्र पुढे बोलताना मात्र त्यांनी पातळी सोडली. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत असं वाटत नाही असं पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकरांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं, त्यांना समज दिलीय : मुख्यमंत्री
पडळकरांनी नुकतंच केलेलं वक्तव्य हे पहिलंच नाही, तर या आधीही शिवराळ भाषेच्या नावाखाली त्यांनी पवार कुटुंबीयांवर बोलताना अपशब्द वापरल्याचं दिसतंय. आमदार असतानाही त्यांच्या या कार्यात खंड पडला नाही हे विशेष. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या आधीही त्यांना वेळोवेळी समज दिली आहे, पण ठोस अशी कारवाई केल्याचं दिसत नाही. गोपीचंद पडळकरांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं आहे, त्यांना समज दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पडळकर हे तरुण नेते आहेत, भविष्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते, त्यांनी जपून बोललं पाहिजे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या:
Gopichand Padalkar : शिवराळ भाषेच्या नावाखाली पडळकर किती घसरणार? या आधीही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
आणखी वाचा
Comments are closed.