महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदी सदानंद दातेंची होणार नियुक्ती

एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दाते हे १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पोलीस महासंचालक पदाची कारकीर्द डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलीस, एसपी नवी मुंबई आदी पदावर काम केले आहे. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्लॅक कॅट’ कमांडोनी विविध ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.

Comments are closed.