साहिबजादा फरहानकडून विराट कोहलीचा रेकॉर्ड उध्वस्त! ठरला एका टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

साहिबजादा फरहानने (Sahibjada Farhan) एकाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने टीम इंडियाच्या विराट कोहलीला (Sahibjada Farhan breaks Virat Kohli’s record) मागे टाकत हे यश मिळवले. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 38 धावा पूर्ण करताच त्याने विराटचा विक्रम मोडीत काढला. फरहानने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे.

एका टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारी यादी

साहिबजादा फरहान (पाकिस्तान): ३२०+ धावा
विराट कोहली (भारत): ३१९ धावा (२०१४)
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका): 317 धावा (2009)
बाबर आझम (पाकिस्तान): 303 धावा (2021)
महेला जयवर्धने (श्रीलंका): 302 धावा (2010)

विराट कोहलीने 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 6 डावांत 106.33 च्या सरासरीने 316 धावा केल्या होत्या. त्या स्पर्धेत विराटने 4 अर्धशतके ठोकली होती. याशिवाय विराटने 2022 च्या वर्ल्ड कपमध्येही 296 धावा केल्या होत्या.

एका हंगामाचा विचार करता फरहान पुढे गेला असला, तरी टी-20 वर्ल्ड कपच्या संपूर्ण इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम अजूनही विराट कोहलीच्याच नावावर आहे.

विराट कोहली (भारत): 1,292 धावा (33 डाव)
रोहित शर्मा (भारत): 1,220 धावा
जोस बटलर (इंग्लंड): 1,075 धावा

Comments are closed.