गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, अचानक…
आयएनडी वि पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 21 सप्टेंबर रोजी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हरकती समोर आल्या.
सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने (Sahibzada Farhan) अर्धशतक झळकावताच बॅटनं AK 47 प्रमाणं गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन केलं. साहिबजादा फरहानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. सदर प्रकरणानंतर सोशल मीडियावर साहिबजादा फरहानला चांगलेच ट्रोल करण्यात आले. तसेच साहिबजादा फरहानवर आयसीसीने कारवाई करावी, अशी मागणी देखील भारतीयांकडून करण्यात आली. या सर्व प्रकरणावर आता साहिबजादा फरहानने प्रतिक्रिया दिली आहे.
शेवटच्या सामन्यात भारताचा कर्णधार सशस्त्र सैन्याने क्रिकेटमध्ये आणला. आजच्या सामन्यात आता पाकिस्तानी खेळाडू परतफेड करतात. क्रिकेटमध्ये राजकारण आणणे ही एक दुहेरी तलवार आहे. #Indvpak pic.twitter.com/tzl2qxgpy8
– 𝕌ℕ𝔼𝕋𝔼𝔻 🇮🇳 𝕀ℕ𝔻𝕀𝔸 (@a48cbb7b672c40c) 22 सप्टेंबर, 2025
लोक काय बोलतीय याची मला पर्वा नाही- साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan On Celebration)
मी जे गन सेलिब्रेशन केलं होतं, ती त्याक्षणी घडलेली तात्कालिक घटना होती. खरंतर मी 50 धावा काढल्यावर फारसं सेलिब्रेशन करत नाही. मात्र अचानक माझ्या डोक्यात आलं आणि मी त्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. यावर लोक काय प्रतिक्रिया देतील याची मला कल्पना नव्हती आणि त्याची पर्वाही मी केली नाही. तुम्हाला जिथे खेळायचं आहे तिथे आक्रमक होऊन खेळलं पाहिजे, असं साहिबजादा फरहान म्हणाला. त्यामुळे यावरून वाद झाल्यानंतरही फरहानचा माजोरडेपणा कायम असल्याचं दिसून येतंय.
कोण आहे साहिबझादा फरहान? (Who is Sahibzada Farhan?)
साहिबझादा फरहानचा जन्म 3 मार्च 1996 रोजी पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथे झाला. साहिबझादा फरहान पाकिस्तानचा आक्रमक शैलीत खेळणारा उजव्या हाताचा सलामी फलंदाज आहे. साहिबझादा फरहान स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवले. साहिबझादा फरहान प्रामुख्याने पाकिस्तानसाठी T20 फॉरमॅटमध्ये खेळतो. जुलै 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध साहिबझादा फरहानने टी-20 मध्ये पदार्पण केले.
साहिबझादा फरहान कारकीर्द-
1. फर्स्ट क्लास: 70 हून अधिक सामने, 4000 हून अधिक धावा
2. लिस्ट-ए: 50 हून अधिक सामने, 1800 हून अधिक धावा
3. आंतरराष्ट्रीय टी-20: 90 हून अधिक सामने, 2000 हून अधिक धावा
संबंधित बातमी:
इंडियन वि पॅक असिया कप आता हॅरिस रौतेनीही दिव्चलान, मला जमिनीवर माहित नाही, जमिनीत गाठ,
आणखी वाचा
Comments are closed.