गन शॉट सेलीब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची नाटकं सुरुच, आयसीसीला दाखवला ठेंगा


नवी दिल्ली: आशिया कपमध्ये भारताविरूद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा खेळाडू साहिबजादा फरहान अर्धशतक झाल्यानंतर केलेल्या गनशॉट सेलिब्रेशनमुळं वादात अडकला होता साहिबजादा फरहानवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं त्यासंदर्भात आयसीसीकडे तक्रार केली होती. आयसीसीनं साहिबजादा फरहानला ताकीद देत सोडून दिलं होतं. त्यानंतरही साहिबजादा फरहानची नाटकं सुरु आहेत. एका जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी साहिबजादा फरहाननं बॅट बंदुकीप्रमाणं पकडलीय.

साहिबाजादा फरहानच्या जाहिरातीच्या चित्रिकरणातून घेण्यात आलेल्या फोटोंमुळं सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. 21 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 4 ची मॅच सुरु होती. त्यावेळी साहिबजादा फरहाननं अर्धशतक केल्यानंतर बॅट बंदुकीप्रमाणं पकडून सेलीब्रेशन केलं होतं.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारताच्या 26 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्या घटनेबाबत भारतीयांच्या वेदना आणि रोष कायम असतानाच साहिबाजादा फरहाननं केलेल्या कृतीनं भारतीय चाहते भडकले होते.

दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफनं मॅचदरम्यान फायटर विमानं पाडल्यासारखा इशारा केला होता. त्यामुळं आयसीसीनं राऊफवर 30 टक्के दंड लादला होता. तर साहिबजादा फरहानला ताकीद देत सोडून दिलं होतं.

India beat Pak : भारताचा पाकिस्तानवर तीन वेळा विजय

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते. भारतानं ग्रुप स्टेज, सुपर फोर आणि फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं.भारतानं 28 सप्टेंबरला पाकिस्तानला अंतिम फेरीच्या लढतीत  विकेटनं पराभूत केलं. अंतिम फेरीत तिलक वर्मानं केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद आणि पीसीबीचे चेअरमन असलेल्या मोहम्मद नक्वीनं ट्रॉफी भारताला सोपवली नाही. भारतानं नक्वीच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुन वादंग निर्माण झाले होते.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या महिला संघात कोलंबोत महिला वनडे वर्ल्ड कपची मॅच पार पडली. त्यात देखील भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येऊ शकतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.