राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार
‘काळ्यानिळ्या रेषा’साठी होणार गौरव : नवतेज सरना यांनाही मिळणार सन्मान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या साहित्यकृतीसाठी लेखक राजू बाविस्कर यांना साहित्य अकॅडमीचा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. गावगाड्यातील वेदनांचे चित्रण रेखाटणारी साहित्यकृती म्हणून ‘काळ्यानिळ्या रेषा’ प्रसिद्ध आहे. चित्रकार असलेल्या राजू बाविस्कर यांचे हे आत्मकथन आहे. निबंध-पुरस्कृत पुस्तकांच्या श्रेणीत ‘केकणी : काव्य रुपां आनी रुपका’ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदीच्या वरिष्ठ कथाकार ममता कालिया यांचा ‘जीते जी इलाहाबाद’ या साहित्यकृतीसाठी त्यांचा हा गौरव होणार आहे. तर माजी मुत्सद्दी अन् लेखक नवतेज सरना यांना क्रिमसन स्प्रिंग या कादंबरीसाठी साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळणार आहे.
अकॅडमीकडून मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकॅडमी पुस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये 8 कविता संग्रह, 4 कादंबऱ्या, 6 कथासंग्रह, दोन निबंध, एक साहित्यिक समीक्षा, आत्मकथा आणि दोन संस्मरण पुस्तके सामील आहेत.
बंगाली भाषेतील श्रेष्ठ कविता या साहित्यकृतीकरता प्रसून बंडोपाध्याय यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. भट्टखडकी या गुजराती साहित्यकृतीकरता योगेश वैद्य यांचा सन्मान केला जाणार आहे. कन्नड भाषेतील दादा शिरिस तंदे या साहित्यकृतीकरता अमरेश नुगडोनी यांना साहित्य अकॅडमी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तर सेफ्टी किट या पंजाबी साहित्यकृतीसाठी जिंदर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. राजस्थानी भाषेतील भारखामा या साहित्यकृतीसाठी जितेंद्र कुमार तर तमिळमधील तामिझ सिरुकटायियन थडंगल साहित्यकृतीसाठी एस.एस. तमिळसेल्वम यांना गौरविण्यात येणार आहे. ‘सफर जारी है’ या उर्दूमधील साहित्य कलाकृतीसाठी प्रितपाल सिंह बेताब आणि तेलगूमधील अनिमेषा साहित्यकृतीसाठी नंदिनी सिद्ध रे•ाr यांना पुरस्कार दिला जाणार आहे. संस्कृत भाषेतील साहित्यकृतीकरता महामोहपाध्याय साहू भद्रेशदास यांना गौरविण्यात येणार आहे.
उडिया भाषेतील पादपुराण या साहित्यकृतीकरता गिरिजा कुमार बलियार सिंह यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नेपाळी पारंपरिक संस्कृती र सभ्यताको दुकुटी या साहित्य कलाकृतीकरता प्रकाश भट्टाराई यांना सन्मानित करण्यात आले.
Comments are closed.