साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी 102 ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण

श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्ताने सोमवारी श्री साईबाबांच्या चरणी 102.450 ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली.

अर्पण केलेल्या सोन्याच्या मूर्तीची किंमत 12 लाख 39 हजार 440 इतकी असून, दानशूर साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थानकडे केली आहे. ही सोन्याची गणेश मूर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्ताचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

Comments are closed.