इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साई सुदर्शनने ठोकला शड्डू; रोहित-विराटच्या जागी मिळणार संधी

साई सुधरसन इंड वि इंजी टूर: सध्या आयपीएल 2025 ची (IPL 2025) स्पर्धा सुरु आहे. या हंगामात गुजरात टायटन्स संघाकडून खेळणारा फलंदाज बी. साई सुदर्शनने (Sai Sudharsan) दोन शतके झळकावली आहेत. यंदाच्या हंगामात साई सुदर्शन चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी साई सुदर्शनची निवड निश्चित मानली जात आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध काल झालेल्या सामन्यात साई सुदर्शनने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावले. साई सुदर्शनने 61 चेंडूत 108 धावा करत गुजरातला एकतर्फी विजय मिळवून दिला. तसेच आयपीएल 2025 च्या हंगामात साई सुदर्शनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. आतापर्यंत 12 सामन्यात साई सुदर्शनने 617 धावा झळकावल्या आहेत.  त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत साई सुदर्शनने आपला दावा ठोकल्याची चर्चा रंगली आहे.

रोहित किंवा विराटच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता-

भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी 2025 मध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत युवा फलंदाज बी. साई सुदर्शन याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर संघात निर्माण झालेल्या रिक्त जागा भरण्यासाठी साई सुदर्शनला संधी दिली जाऊ शकते. साई सुदर्शनला इंग्लंड दौऱ्यात सलामीवीर किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. दरम्यान, साई सुदर्शनची सातत्यपूर्ण कामगिरी आणि विविध फॉरमॅटमध्ये त्याचे यश पाहता, तो भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यातील एक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.

साई सुदर्शनकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता- रवी शास्त्री

साई सुदर्शनकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे आणि मला त्याला कसोटी खेळताना पहायचे आहे, असं भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रवी शास्त्री म्हणाले. सुदर्शनने काउंटी क्रिकेटमध्ये इंग्लिश परिस्थितीशी जुळवून घेतले आहे, डावखुरा फलंदाज म्हणून त्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. जर नवीन खेळाडूंपैकी कोणाला संधी द्यायची असेल तर सुदर्शन हा सर्वोत्तम पर्याय आहे. इंग्लंडविरुद्ध साई सुदर्शनला संधी द्यायला हवी, असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे.

सुदर्शनने तामिळनाडूसाठी द्विशतक झळकावले-

साई सुदर्शन 2023 आणि 2024 मध्ये सरेकडून काउंटी क्रिकेट खेळेल. त्याने इंग्लिश परिस्थितीत 5 सामने खेळले आणि 1 शतकाच्या मदतीने 281 धावा केल्या. साई सुदर्शन तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि आतापर्यंत 29 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीने 1957 धावा केल्या आहेत. यामध्ये दिल्लीविरुद्धच्या द्विशतकाचाही समावेश आहे.

टीम इंडिया-अ इंग्लंड दौरा-

टीम इंडिया-अ चा इंग्लंड दौरा 30 मे पासून सुरू होईल. भारतीय संघ इंग्लंड लायन्ससोबत दोन प्रथम श्रेणी सामने खेळेल. यानंतर, 13 जूनपासून संघांतर्गत सामना खेळवला जाईल. आयपीएल (IPL 2025) मुळे शुभमन गिल आणि साई सुदर्शन या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात खेळणार नाहीत. गिल आणि सुदर्शन दोघेही गुजरात टायटन्स संघात आहेत. त्याच वेळी, गुजरात संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल हे जवळजवळ निश्चित आहे. यामुळे, हे दोन्ही खेळाडू पहिला सामना खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत. आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी खेळला जाईल.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघ जाहीर-

अभिमन्यू देवन (डार्ले), ध्रुवधर्म (अपरकरदार), यसावी जस्ल, करुणा, नितीश कुमार रेड्डी, कुरीस, इशान किशन, मुख कुमार, मुख, मुख, मुखश, मुख्श, अकाश्माद. दुबे, शुभ आणि साई सुदर्स (इतर सामन्यांमधून उपलब्ध क्रॉड्स)

संबंधित बातमी:

Asia Cup 2025 मोठी बातमी: टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून घेणार माघार; BCCI चा निर्णय जवळपास निश्चित, लवकरच घोषणा

अधिक पाहा..

Comments are closed.