सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर, मोहम्मद आलियानचं भारतात अवैध वास्तव्य

सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. याआधी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी असून त्याचं नाव विजय दास असल्याचं समोर आलं होतं. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर असून त्याचं नाव मोहम्मद असल्याचं कळतंय. या प्रकरणात दोन दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश आलं आहे.

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर

पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु होता. यामध्ये पोलिसांच्या हाती आता मोठी माहिती लागली आहे की, आरोपी बांगलादेशी घुसखोर आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अवैधरित्या भारतात वास्तव्यास होता. तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीनं वेशांतर केलं, नाव बदललं आणि तो ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये पोहोचला. या लेबर कॅम्पमधूनच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीचं भारतात अवैध वास्तव्य

आरोपी अवैधरित्या भारतामध्ये राहत होता, त्याने विजय असं नाव धारण केलेलं होतं. मोहम्मदने चोरीच्या उद्देशाने त्यांना सैफ अली खान वरती हल्ला केल्याची माहिती मिळते. आता हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, बांगलादेशी घुसखोर असून भारतामध्ये अवैध वास्तव्य करत होता. त्याने सैफवर हल्ला केला आणि त्यानंतर तो ठाण्यामध्ये लेबर कॅम्पमध्ये परतला. याच लेबर कॅम्पमधून पोलिसांनी मोहम्मदला अटक केली.

आरोपी नामांकित कंपनीमध्ये नोकरीला

देशातील वेगवेगळ्या भागातून अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं जात आहे आणि त्यावर हल्ला करणारा आरोपी देखील बांगलादेशी घुसखोर असल्यास समोर आल्याने खळबळ माजली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्याची कासारवडवली हिरानंदानी पूर्व परिसरातून अटक करण्यात आली. या भागात तो एका नामांकित कंपनीमध्ये लेबरर म्हणून काम करत होता. नामांकित कंपनीत अशा व्यक्तीला कामावर ठेवण्यावरही आता प्रश्वचिन्ह उपस्थित होत आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं खरं नाव काय?

दरम्यान, आरोपीच्या नावाबाबत मोठा संभ्रम असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला आरोपीचं नाव विजय दास असून तो पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती होती. त्यानंतर तो बांगलादेशी घुसखोर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. यानंतर आरोपीची मोहम्मद आलियान, मोहम्मद एलियास आणि मोहम्मद सज्जाद अशी आरोपीची अनेक नावं समोर येत आहेत. आता त्याची खरी ओळख काय हे पोलिस तपासात समोर येईल.

मोठ्या कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये

पोलिसांना संशय आहे की, आरोपी अवैधरित्या भारतात आला असावा, कारण आधी त्याने त्याचं नाव विजय दास सांगितलं, पण नंतर त्याचं नाव मोहम्मद  आलियान असल्याचं समोर आलं. चौकशीमध्ये समोर आलं की, आरोपी एक कामगार असून तो एका मोठ्या कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये होता. तिथे तो काम करायचा. अशा मोठ्या कंपनीमध्ये हा व्यक्ती काम करतो आणि सैफ अली खानच्या घरी चोरी करुन पुन्हा लेबर कॅम्पमध्ये जातो, हे फार धक्कादायक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

Comments are closed.