Saif ali khan attack jitendra awhad on why he is standing against walkmik karad mention santosh deshmukh wife
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण आणि दोनच दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला या दोन्ही घटना चांगल्याच गाजत आहेत. या प्रकरणांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही प्रकरणांमधील हल्लेखोरांसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Jitendra Awhad Stand Against Walkmik Karad : मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण आणि दोनच दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला या दोन्ही घटना चांगल्याच गाजत आहेत. या घटनांवरून राज्यातील कायदा – सुव्यवस्थेवरून प्रश्न उठवले जात आहेत. तर यावरून सत्ताधारी – विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही प्रकरणांमधील हल्लेखोरांसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.(saif ali khan attack jitendra awhad on why he is standing against walkmik karad mention santosh deshmukh wife)
या दोन्ही प्रकरणातील हल्लेखोरांना समोर आणा, असे आवाहनही आव्हाड यांनी केले आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचे मूळ कारण त्याच्या मुलाचे नाव – तैमूर असल्याचा पुनरुच्चार करतानाच आता मूळ टार्गेट त्याचा मुलगा तैमूर होता असा खळबळजनक दावा आव्हाडांनी केला आहे. या पोस्टमध्ये आव्हाड यांनी वाल्मिक कराडच्या जातीचाही उल्लेख केला आहे.
गुरुवारी मध्यरात्रीनंतर सैफ अली खानवर हल्ला झाल्याचं सकाळी समोर येताच आव्हाड यांनी या हल्ल्यामागे धार्मिक कट्टरतावादी तर नाही ना, असा संशय उपस्थित केला आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आव्हाड यांनी आणखी एक विधान केलं. “प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथी या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले, असे आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हल्ला करणारा कुणी ही असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला उघडा केलाच पाहिजे तो मुसलमान असेल तर त्याच्या विरोधात विचार करा तैमूर तुमचा मुलगा असता तर?
वाल्मिक कर्हाड माझ्या जातीतला पण मी सत्या च्या बाजूने उभा राहिलो.
विचार एकच होता संतोष ची बायको माझी बहीण असती तर ?
हे जात धर्माचे… https://t.co/SPc0i9CxVi— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2025
सैफ अली खान याच्या हल्ल्यावरील पोस्टनंतर आव्हाडांनी आणखी एक पोस्ट केली आणि त्यात वाल्मीक कराडचा आणि त्याच्या जातीचा देखील उल्लेख केला. मी आणि कराड एकाच जातीचे आहोत हे सांगतानाच तरीही मी त्याच्याविरोधात उभं राहायचा निर्णय घेतला, असे आव्हाड सांगतात.
हल्ला करणारा कुणी ही असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला उघडा केलाच पाहिजे तो मुसलमान असेल तर त्याच्या विरोधात विचार करा, तैमूर तुमचा मुलगा असता तर?” असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना, “वाल्मिक कराड माझ्या जातीतला पण मी सत्याच्या बाजूने उभा राहिलो. विचार एकच होता, संतोषची बायको माझी बहीण असती तर?” असंही म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटी, “हे जात धर्माचे खूळ सोडा. सत्याच्या मागे उभे रहा,” असं आवाहनही आव्हाड यांनी केलं आहे.
हेही वाचा – Ajit Pawar NCP : पवारांचा आमदार अजित दादांच्या राष्ट्रवादीत; आमदारकी रद्द करण्याचं पत्र घेतलं मागे
Comments are closed.