Saif Ali Khan Attack Update data dump technology helps mumbai police to identify attacker whats is data dump technology news in marathi
‘नबाव’ अशी ओळख असलेला आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील धोका टळला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत. पुढील सात ते आठ दिवस सैफ अली खान याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, आयसीयुतून सैफला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मुंबई : ‘नबाव’ अशी ओळख असलेला आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील धोका टळला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत. पुढील सात ते आठ दिवस सैफ अली खान याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, आयसीयुतून सैफला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पण सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली असली तरी, त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला शोधणं पोलिसांसमोर आव्हान होतं. कारण पोलिसांच्या 35 तुकड्या सैफवरील हल्ल्याचा तपास करत होत्या. मात्र, या सगळ्यात पोलिसांनी साथ मिळाली ती, Data Dump या तंत्रज्ञानाची… कारण याच Data Dump तंत्रज्ञानामुळे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शर्तीच्या प्रयत्नांवर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लोखोराचा पोलीस शोध घेत होते. त्यावेळी हल्लेखोराला ओळखण्यासाठी Data Dump तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे त्याच्या मोबाईलचे लोकेशन समोर आले आणि त्यानंतर हल्लेखोराची ओळख पटली. तर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना त्याची ओळख पक्की झाली होती. (Saif Ali Khan Attack Update data dump technology helps mumbai police to identify attacker whats is data dump technology news in marathi)
गुरूवार 16 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोराने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला. जवळपास सहा चाकुचे वार चोराने सैफवर केले. त्यातील दोन वार गंभीर होते. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुरूवातील सात तुकड्या तैनात केला. त्यानंतर पोलिसांच्या तुकड्या आतापर्यंत 35 वर पोहोचली. पण आरोपीचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी पोलिसांनी या परिसरातील डेटा डंप एकत्र केले. डेटा डंम याच्या मदतीने त्या परिसरातील मोबाईल टॉवरचा डेटा एकत्रित मिळतो. पोलिसांनी हल्ल्यावेळचा सर्व मोबाईल टॉवरवरील डेटा डंप घेतला. त्याआधारे पोलीस हल्लेखोरापर्यंत पोहचली.
Data Dump तंत्रज्ञान काय असतं?
- एका मर्यादित स्वरुपात मोबाईल फोन टॉवर लागलेले असतात.
- या टॉवरच्या मदतीने त्या परिसरातील सर्व ॲक्टिव असणाऱ्या मोबाईल फोन नेटवर्कची माहिती मिळते.
- डेटा डंप तंत्रज्ञानाआधारे त्या टॉवरवर किती मोबाईल क्रमांक जोडले त्याची माहिती मिळते.
- मोबाईल किती वेळ ॲक्टिव होता, तो कधी बंद झाला, याची माहिती मिळते.
- अर्थात हे तंत्रज्ञान केवळ फोन लोकेशन ट्रेस करण्यासाठी उपयोगी पडते.
- प्रत्येक मोबाईल टॉवर हा फोन कनेक्ट झाला की त्याचा डेटा स्टोअर करतात.
- जेव्हा कोणताही मोबाईल एखादा टॉवरशी कनेक्ट होतो.
- तेव्हा या टॉवरवर त्याचे एक खाते तयार होते.
- जेव्हा मोबाईल दुसऱ्या टॉवरकडे जातो, तेव्हा तिथे पण अशीच प्रक्रिया होते.
- प्रत्येक टॉवरवर लॉग तयार होतो.
- डेटा डंपमध्ये जो डेटा स्टोअर होतो. त्यात फोनशी संबंधित सर्व माहिती जसे की IMEI क्रमांक, मॅक ॲड्रेस, आईपी ॲड्रेस और लोकेशन सह इतर डेटा जतन करण्यात येतो.
- विविध सॉफ्टवेअरचा वापर करून त्यातून युझर्सचा कॉल लॉग्स, टेक्स्ट मॅसेज, फाईल्स, ब्राऊझिंग हिस्ट्री आणि ई-मेल सारखी माहिती गोळा होते.
हेही वाचा – Ashish Shelar : आदित्य ठाकरे वांद्र्याला कुठे यायचे त्याच उत्तर आहे; ‘सैफ’ हल्ल्यावरून शेलारांचं प्रत्युत्तर
Comments are closed.