Saif Ali Khan Attacked – चोरीसाठी घरात घुसला होता, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली; पोलिसांनी दिली मोठी अपटेड
अभिनेता सैफ अली खानवर वार करणाऱ्या आरोपीची ओळख पटल्याची मोठी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी झोन 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना माहिती दिली. अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री जो हल्ला झाला या प्रकरणी पोलिसांची 10 वेगवेगळी पथकं तपास करत आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलीस अधिकारी गेडाम यांनी सांगितले.
#पाहा | अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरून
दीक्षित गेडाम, डीसीपी झोन 9, मुंबई पोलिस म्हणतात, “काल रात्री, “आरोपींनी सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यासाठी फायर एस्केप जिना वापरला. हा लुटमारीचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. आम्ही आरोपींना पकडण्याचे काम करत आहोत. 10 शोध पथके काम करत आहेत… pic.twitter.com/g6oLZH9w7f— ANI (@ANI) 16 जानेवारी 2025
आतापर्यंतच्या तपासात हा चोरीचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. आरोपीला लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर पुढील सर्व माहिती माध्यमांना दिली जाईल, असे गेडाम म्हणाले.
इमारतीवरील अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्यानं आरोपीने इमारतीमध्ये प्रवेश केला. यानंतर जिन्याच्या वापर करत तो घरात घुसला होता. या आरोपीची ओळख पटली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त गेडाम यांनी दिली.
Comments are closed.