Saif Ali Khan Attack – सैफवरील हल्लेखोराला 72 तासानंतर अटक, ठाण्यातून आवळल्या मुसक्या
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या 72 तासांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्यातील कासारवडवली भागातील हिरानंदानी लेबर कॅम्पमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. विजय दास उर्फ बिजॉय दास उर्फ मोहम्मद इलियास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विजय दास याला वांद्र्यातील होली डे कोर्टात हजर केला जाणार आहे.
अपडेट | सैफ अली खान हल्ला प्रकरण | मुंबई पोलिसांनी पुष्टी केली आहे की आरोपी विजय दास, बिजॉय दास आणि मोहम्मद इलियास यासह अनेक नावे वापरत होता. https://t.co/0n0JQzTWDs
— ANI (@ANI) 19 जानेवारी 2025
अटकेनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोप विजय दास हा एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करत होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. मुंबई पोलीस या संदर्भात सकाळी नऊच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.
Comments are closed.