सैफ अली खान हल्ला प्रकरण- सुटकेसाठी आरोपीचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात घुसून चाकूने हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने आज वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला? पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असून सुटका करण्यात यावी अशी मागणी त्याने केली आहे?

आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या शरीफुल याने एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता? शुक्रवारी त्याने हा अर्ज मागे घेत वांद्रे दंडाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज केला? आपल्याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नाही? त्यामुळे, आपली अटक बेकायदा ठरवावी आणि आपल्या सुटकेचे आदेश द्यावेत, अशी मागणी शरीफुल याने या दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे? न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन त्यावर पोलिसांना 13 मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत? या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते? त्या पार्श्वभूमीवर शरीफुल याने जामिनासाठी अर्ज केला आहे?

Comments are closed.