Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTV

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTV

सैफ अली खान केस अपडेटः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला होऊन दोन दिवस उलटले आहे.  पण, या प्रकरणातील हल्लेखोर सध्या फरार आहे. सैफ अली खानवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

दोन दिवसांनंतरही सैफचा हल्लेखोर मोकाटच

सैफ अली खानवरील हल्ल्याला  50 तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र यातील हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहे. काल रात्रीपासून वांद्रे पोलिस ठाण्यात अश्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जे या विभागात विनाकारण भटकत होते.तसेच काही सराईत गुन्हेगारांना ही पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांना सिसिटीव्ही फुटेज दाखवून आरोपीची ओळख  पटविण्याचा प्रयत्न केला जात होता.

Comments are closed.