आकांक्षा बोरकरचा तायक्वांदो चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण चौकार

चासकमान धरण परिसरातील सायगाव येथील आकांक्षा बोरकर हिने 37 व्या राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदक पटकाविण्याचा पराक्रम केला. नाशिक येथे 18 ते 20 जुलैदरम्यान राज्यभरातील सर्व जिह्यांतील विविध गटामध्ये मुला-मुलींची ही तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा विविध वजनीगटात पार पडल्या. या स्पर्धेत 57 किलो वजनी गटात खेड तालुक्यातील आकांक्षा बोरकर हिने सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले.या सोनेरी कामगिरीच्या जोरावर आकांक्षाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. आकांक्षाला आई चंद्रकला बोरकर, जालिंदर साळवे, नीलेश भिलारी, रोहन बांगर यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेच्या वेळी महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सचिव गफार पठाण, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, पुणे जिल्हा तायक्वांदो अध्यक्ष अनिल झोडगे, सचिव तुषार आवटे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.