संत अवकस्वामी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संत आवकास्वामी म्हणजे समर्थांच्या थोर शिष्य संत चिमणाबाई. अतिशय शांत, धीट आणि मातृत्व भावनेने जिंकणारे व्यक्तिमत्व. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झाल्याने त्या कायमच्या माहेरी आल्या. चिमणाबाईंच्या वडिलांची समर्थांशी भेट झाली. समर्थ त्यांच्या घरी आले असता त्यांनी बालविधवा चिमणाबाईंना पाहिले. त्यांचे केशवपन, नेसलेले आलवण पाहून समर्थ अस्वस्थ झाले. समर्थांनी चिमणाबाईंना परमार्थाचा मार्ग दाखवत अनुग्रह दिला. आणि तेव्हापासून त्या रामदासी संप्रदायाच्या शिष्या झाल्या. त्यांना आवका असे नाव दिले. या आवकास्वामी चाफळला समर्थांच्या सेवेत रुजू झाल्या. आपल्या सेवेतून त्यांनी शिष्यांना योग्य पाठ दिला. समर्थांनी त्यांना मठपती केले. चाफळच्या मठाची जबाबदारी त्यांना दिली. समर्थांनी आवकास्वामींच्या अनेक परीक्षा घेतल्या परंतु प्रत्येक वेळी त्या आदर्शवादी ठरल्या. आवकास्वामी रामायण, एकनाथी भागवत, पांडवप्रताप अशा ग्रंथाचे निरूपण करून ग्रंथांच्या सहवासात वेळ घालवित. माऊली होऊन त्या 86 वर्षे समर्पित जीवन जगल्या. समर्थ संप्रदायात त्यांचे खूप मोठे महत्त्व आहे.

Comments are closed.