पूरग्रस्तांसाठी धावला ‘सखाराम बाइंडर’

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडून विलंब होत असला तरी समाजातून अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सखाराम बाइंडर धावून गेला आहे. ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाच्या दिल्लीतील शुभारंभाच्या प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाईल, अशी माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी दिली. नाटकाचे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही त्याला जोड म्हणून पुढील दहा प्रयोगासाठी फक्त एक रुपया मानधन घेऊन ऊर्वरित रक्कम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. या नाटकात सयाजी शिंदे यांच्यासोबतच नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कसलेले कलाकार भूमिका साकारत आहेत.
Comments are closed.