साक्षी बुरकुलेला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत यवतमाळ च्या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला. वेटलिफ्टिंगच्या ८६ किलो गटात सर्वाधिक एकूण १५० किलो वजन पेलून साक्षी बुरकुलेने पर्दापणातच सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला.
स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात साक्षीने ६८ किलो तर क्लिन ॲन्ड जर्क प्रकारात ८२ किलो वजनाची कामगिरी करीत अव्वल स्थान पटकावले. यजमान छत्तीसगडच्या रूषिका कश्यपने १२१ किलोसह रौप्य पदक जिंकले. ११८ किलो वजनाची कामगिरी करणाऱ्या आसामच्या बितूपूर्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
Comments are closed.