सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक, लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू, आज मेडिकल बुलेटीन देणार
हिंदी सिनेसृष्टीचे ख्यातनाम लेखक, पटकथाकार सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक आहे. सलीम खान यांना बुधवारी सकाळी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता सलीम खान यांचे हेल्थ बुलेटीन जारी केले जाणार आहे.
90 वर्षीय सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर जलील पारकर यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. ‘‘सलीम खान यांना सकाळी 8.30 वाजता लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे फॅमिली डॉक्टर संदीप चोपडा यांनी त्यांना इमर्जन्सीमध्ये आणले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. डॉ. विनय चव्हाण, डॉ. अजित मेनन, डॉ. नितीन डांगे, डॉ. बिनीत अहलुवालिया या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू आहेत, असे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले. कुटुंबांच्या विनंतीचा आदर करून आज कोणतीही अधिक माहिती शेअर केली जात नाही. उद्या सकाळी 11 वाजता, आम्ही कुटुंबाच्या संमतीने आणि रुग्णाची संपूर्ण गोपनीयता राखून एक प्रेस बुलेटीन जारी करू, ते सध्या स्थिर आहेत. त्यांच्या क्लिनिकल स्टेटसचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे,’’ असेही त्यांनी
सांगितले.
सलीम खान यांनी रुग्णालयात दाखल करताच अभिनेता सलमान खान याच्यासह संपूर्ण खान कुटुंबाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली.
Comments are closed.