सलमान आगाने टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर! जाणून घ्या काय म्हणाला?
पाकिस्तान संघ आता अनेक बदलांमधून जात आहे. सलमान अली आगा याला रिझवानच्या जागी टी 20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. सलमानला कर्णधार केल्यावर पाकिस्तानला पहिल्या दोन टी20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण तिसऱ्या टी20 सामन्यात शानदार विजय मिळवला. यानंतर सलमान आगाने केलेल्या विधानामुळे सर्वांची बोलती बंद झाली आहे.
शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टी20 सामना पाकिस्तानने 9 विकेट्स जिंकला. या सामन्यात न्युझीलँडने प्रथम फलंदाजी करत 204 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना पाकिस्ताननी 16 षटकात फक्त एक विकेट गमावून सामना जिंकला. पाकिस्तानसाठी मोहम्मद नवाजने नाबाद शतकी खेळी केली. तसेच कर्णधार सलमान आगाने अर्धशतकी खेळी केली.
सामन्याच्या नंतर कर्णधार सलमान अली आगा म्हणाला, आम्ही खेळामधे चांगल प्रदर्शन केलं. गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली नंतर दोन युवा खेळाडूंनी सुद्धा चांगली कामगिरी केली. जर तुम्ही युवा खेळाडूंचे कौतुक कराल तर ते पुढे अजून चांगलं खेळू शकतील.
मी खेळाडूंना सांगितले होते की,जर तुम्ही चांगली फलंदाजी केली तर आपण सामना जिंकू शकतो. तसेच गोलंदाजानी सुद्धा चांगले प्रदर्शन केले. त्यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना 210 धावांवर अडवले. हा करा नाहीतर मरा सामना होता. पुढच्या सामन्यासाठी आम्हाला प्रतीक्षा आहे.
जेव्हा सलमान आली आगाला टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले तेव्हापासूनच त्याच्यावर खूप टीका होत होत्या. तसेच न्यूझीलंड सोबतच्या पहिल्या दोन टी20 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हा माजी खेळाडूंनी त्याच्यावर खूप टीका केली. आता तिसऱ्या सामन्यानंतर विजय मिळवून त्याने सर्वांची बोलती बंद केली आहे.
Comments are closed.