सलमानची ‘It’s Done Bro’ लाइन थेट राजकारणात; मीमपासून ते आंदोलनाच्या पोस्टरपर्यंत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याची स्टाईलच वेगळी. त्याचा डायलॉग असो, सोशल मीडिया पोस्ट असो किंवा एखादं साधं वाक्य… त्याला व्हायरल होण्यासाठी फार वेळ लागत नाही. आता सलमानची अशीच एक साधी-सोपी लाइन थेट राजकारणात पोहोचली आहे. ‘It’s Done Bro’ या वाक्याने सोशल मीडिया गाजवल्यानंतर आता राहुल गांधींच्या आंदोलनातही याच लाइनचा नारा पाहायला मिळाला. पहिले मीम्स, मग राजकीय पोस्ट्स आणि आता थेट आंदोलनातील घोषवाक्य… असा या लाइनचा प्रवास झाला आहे. या वाक्याची सुरुवात झाली सामाजिक कार्यकर्ते आणि इंजिनीअर सोनम वांगचुक यांच्यापासून. जुलै मध्ये वांगचुक परीक्षा व्यवस्था आणि NEET-UG पेपर लीकसारख्या मुद्द्यांवर आंदोलन करत होते. त्यांनी सुरू केलेलं 26 दिवसांचं उपोषण 28 जूनला सुरू झालं आणि 23 जुलैला संपलं.

याच काळात सलमान खानने सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांना उपोषण संपवण्याचं आवाहन केलं. आपल्या नेहमीच्या मोकळ्या आणि दोस्ताना अंदाजात सलमानने लिहिलं, “Sonam, it’s done, bro. Don’t extend this…” आणि त्यांना काहीतरी खाण्याचंही आवाहन केलं. सलमानची ही लाइन सोशल मीडियावर अशी काही फिरली की पाहता पाहता ती मीम टेम्पलेट बनली. एखादं काम पूर्ण झालं, एखादा विषय संपला किंवा एखाद्या घटनेवर मिश्कील प्रतिक्रिया द्यायची असेल, तर नेटिझन्सच्या हातात तयार वाक्य होतं ‘It’s Done Bro!’

या व्हायरल लाइनचा सगळ्यात चर्चेचा टप्पा ६ ऑक्टोबरला पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाविरोधात इंडिया ब्लॉकच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करत “Gyanesh, it’s done, bro. Time to resign.” असा संदेश दिला. इतकंच नाही, तर आंदोलनादरम्यान या वाक्याचे प्लेकार्डही पाहायला मिळाले. त्यामुळे सलमान खानच्या सोशल मीडिया पोस्टमधून सुरू झालेला हा छोटासा ‘ब्रो’ आता थेट दिल्लीच्या राजकीय रस्त्यांवर पोहोचला. ‘It’s Done Bro’ची खासियत म्हणजे हे वाक्य सलमानने कोणताही राजकीय संदर्भ ठेवून म्हटलेलं नव्हतं. त्याने आपल्या नेहमीच्या बोलचालीच्या शैलीत सोनम वांगचुक यांना उपोषण संपवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र सोशल मीडियाने या चार शब्दांना अक्षरशः उचलून धरलं.

Comments are closed.