IND vs AUS; ऑस्ट्रेलियासाठी मेलबर्न कसोटीत पदार्पण करणारा सॅम काॅन्स्टास कोण आहे?

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका (Border Gavaskar Trophy) खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले आहेत. आता चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. त्यामध्ये 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासचा (Sam Konstas) प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. तो ‘उस्मान ख्वाजा’सोबत (Usman Khawaja) डावाची सुरुवात करेल. ‘नॅथन मॅकस्विनी’च्या (Nathan McSweeney) जागी सॅम कॉन्स्टासचा संघात समावेश करण्यात आला.

19 वर्षीय सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) हा ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा चौथा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्याची प्रथम श्रेणीतील कारकीर्दही चमकदार आहे, त्याने अलीकडेच पंतप्रधान इलेव्हनकडून खेळताना भारताविरूद्ध शतक झळकावले. भारताविरूद्धच्या कसोटी पदार्पणात छाप पाडण्याची क्षमता सॅम कॉन्स्टासमध्ये आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ‘रिकी पाॅन्टिंग’ने (Ricky Ponting) व्यक्त केले. तो म्हणाला की, या फलंदाजात तो किती चांगला खेळाडू आहे, हे जगाला दाखवून देण्याची जिद्द आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ 11 सामने खेळला आहे. त्याच्या नावावर 11 सामन्यांच्या 18 डावांमध्ये 42.33च्या सरासरीने 718 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 2 शतकेांसह 3 अर्धशतके झळकावली आहेत. 11 ऑक्टोबर रोजी, सॅम कॉन्स्टासने शेफील्ड शिल्डमध्ये 2 शतके झळकावली आणि ही कामगिरी करणारा तो तिसरा सर्वात तरूण खेळाडू ठरला. यानंतर लवकरच त्याने भारताविरूद्ध पंतप्रधान इलेव्हन संघाकडून खेळताना 97 चेंडूत 107 धावांची शानदार खेळी केली.

जेव्हा सॅम काॅन्स्टास (19 वर्षे 85 दिवस) गुरूवारी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाची बॅगी ग्रीन कॅप घालेल, तेव्हा तो कॅप घालणारा चौथा सर्वात तरूण ऑस्ट्रेलियन खेळाडू असेल. इयान क्रेग हा ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे, ज्याने वयाच्या 17 वर्षे आणि 239 दिवसांमध्ये पदार्पण केले. पॅट कमिन्स (18 वर्षे 193 दिवस) दुसऱ्या स्थानावर आणि टॉम गॅरेट (18 वर्षे 232 दिवस) तिसऱ्या स्थानावर आहे.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन- उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टान्स, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड

महत्त्वाच्या बातम्या-

जसप्रीत बुमराहचा कसोटीत मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच भारतीय
अक्षर पटेलचा मुलगा ‘हक्ष’ या नावाचा अर्थ काय? हिंदू पुराणांशी आहे खास संबंध
मिशेल स्टार्क या खास रेकॉर्डपासून फक्त 5 विकेट दूर, लवकरच होणार महान खेळाडूंच्या क्लबमध्ये एंट्री!

Comments are closed.