अखिलेख यांच्या समाजवादी पक्षाचा I-PAC सोबतचा राजकीय प्लॅन रद्द; बंगाल, तामिळनाडू निकालातून धडा
उत्तर प्रदेश निवडणूक: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने निवडणूक व्यवस्थापनासाठी I-PAC या निवडणूक रणनीती कंपनीसोबतचा प्रस्तावित करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पक्षामध्ये काही महिन्यांपासून I-PAC सोबत चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला असून पक्ष आगामी निवडणुका स्वतःच्या संघटनात्मक ताकदीवर लढण्याच्या तयारीत आहे.
SP I-PAC Decision : पराभवानंतर बदलले धोरण
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील निवडणूक निकालानंतर हा निर्णय अधिक गतीने पुढे आला. या दोन्ही राज्यांमध्ये I-PAC संबंधित पक्षांना पराभव पत्करावा लागल्याने समाजवादी पक्षाने रणनीतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना राजकीय सल्ला आणि त्यांचे धोरणे ठरवण्याचं काम I-PAC कंपनीने केल्याची माहिती आहे. परंतु या दोन्ही नेत्यांना त्यांच्या राज्यात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी ई़डी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थांनी I-PAC कंपनीच्या कोलकात्यातील कार्यालयावर छापेमारी केली होती. या कंपनीवर मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले होते. या छापेमारीनंतर मोठा गोंधळ निमाण झाला होता. ममता बॅनर्जी यांनी I-PAC कंपनीच्या कोलकात्यातील कार्यालयाला भेट दिली होती.
UP Election 2027 : आता स्वतःच्या संघटनेवर भर
पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आता बाहेरील सल्लागारांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कार्यकर्त्यांवर आणि स्थानिक संघटनांवर भर दिला जाणार आहे. निवडणूक व्यवस्थापन, प्रचार आणि रणनीती हे सर्व पक्षाच्या अंतर्गत यंत्रणेद्वारेच राबवले जाणार आहेत. अखिलेश यादव यांनी तसा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Political Strategy Change : इतर कारणांचाही प्रभाव
या निर्णयामागे केवळ निवडणूक निकालच नाही, तर आर्थिक अडचणी आणि काही कायदेशीर मुद्द्यांचाही प्रभाव असल्याचं समोर आलं आहे. काही अहवालांनुसार निधीअभावीही I-PAC सोबतचा संबंध पुढे नेणं कठीण झालं होतं. यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीत समाजवादी पक्ष कोणती नवी रणनीती अवलंबतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.