पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणे ही मराठ्यांच्या बलिदानाची प्रतारणा, संभाजीराजेंचे शिक्षण मंत्री यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा काढून टाकले आहे. त्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत पत्र लिहले आहे. या पत्राची प्रत त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे. त्यासोबत त्यांनी ”पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणे ही मराठ्यांच्या बलिदानाची प्रतारणा आहे’, असे म्हटले आहे.

”NCERT ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे. मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकरांनी भाष्य केलेले आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास व राष्ट्राच्या जडणघडणी मध्ये त्यांचे असलेले योगदान भावी पिढीस ज्ञात व्हावे, याकरिता मराठा साम्राज्याचा नकाशा पुनःश्च पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, या मागणीचे सविस्तर पत्र केंद्रीय शिक्षण मंत्री यांस पाठविले आहे”, असे संभाजीराजेंनी ट्विट केले आहे.

Comments are closed.