SambhajiNagar News – ओव्हरलोड ऊसाचा ट्रक उलटला, 6 मजुरांचा मृत्यू; 11 गंभीर जखमी

ओव्हरलोड ऊसाचा ट्रक उलटल्याने भीषण अपघाताची घटना छत्रपती संभाजी नगरमध्ये घडली. या अपघातात सहा मजुरांचा ऊसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले. जखमी मजुरांना छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर घाटावर ही घटना घडली.
अपघातग्रस्त ट्रक रविवारी मध्यरात्रीच्या सुमरास पिशोरहून कन्नडला चालला होता. या ट्रकवर 17 मजुर बसले होते. ट्रक ओव्हरलोड असल्याने घाटाजवळ येताच उलटला. ट्रक उलटल्याने सर्व मजूर ऊसाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. किसान धरमू राठोड, मनोज नामदेव चव्हाण, कृष्ण मूलचंद राठोड, मिथुन महारु चव्हाण, सतकुड अशी मयत मजुरांची नावे आहेत.
Comments are closed.