97 चेंडूत 201 धावा, 20 षटकार अन् 13 चौकारांचा पाऊस; धोनीच्या लाडक्या रिझवीचं वेगवान द्विशतक, VI

समीर रिझवी सर्वात वेगवान द्विशतक: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका खेळवली जात आहे. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक युवा भारतीय फलंदाज आपल्या तुफानी फलंदाजीने इतिहास रचत आहेत. यादरम्यान, 21 वर्षांचा स्टार समीर रिझवीने खळबळ उडवून दिली आहे, ज्याने अंडर-23 राज्य अ ट्रॉफीमध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. उत्तर प्रदेशचा कर्णधार समीर रिझवीने शनिवारी वडोदरा येथे त्रिपुराविरुद्ध पुरुषांच्या 23 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक झळकावले.

चौकार-षटकारांचा पाऊस

21 वर्षीय समीर रिझवीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. त्रिपुराविरुद्धच्या पुरुषांच्या 23 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफी सामन्यात उत्तर प्रदेशचे नेतृत्व करताना रिझवीने केवळ 97 चेंडूत नाबाद 201 धावा केल्या. त्याच्या स्फोटक खेळीत 13 चौकार आणि 20 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता, ज्याने त्रिपुराच्या गोलंदाजांना अक्षरशः रडकुंडीला आणले. 23व्या षटकात रिझवी फलंदाजीला आला आणि त्याने एकहाती संघाला 405 धावांपर्यंत घेऊन गेला.

सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज

97 चेंडू- समीर रिवजी (भारत-यूपी)
107 चेंडू- चाड बोवेस (न्यूझीलंड)
114 चेंडू- नारायण जगदीसन (भारत- तामिळनाडू)
114 चेंडू- ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)
117 चेंडू- ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)
123 चेंडू- बेन डकेट (इंग्लंड)

CSK ने ते करोडोंना घेतले होते विकत

23 वर्षांखालील स्पर्धेतील रिझवीचे हे तिसरे शतक होते. तो आता चार डावात सर्वाधिक 518 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. 2024 च्या इंडियन प्रीमियर लीग लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याला 8.40 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसाठी करारबद्ध केले तेव्हा तो पहिल्यांदा चर्चेत आला. 2024 च्या हंगामात त्याने 5 डावात 118 च्या स्ट्राइक रेटने 51 धावा केल्या. तथापि, सीएसकेने त्याला आयपीएल 2025 हंगामापूर्वी सोडले, त्यानंतर रिझवीला लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 90 लाख रुपयांना विकत घेतले. सध्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे रिझवी आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाचा खेळाडू बनू शकतो.

हे ही वाचा –

Ind vs Aus 4th Test : टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण… एकापाठोपाठ एक खेळाडू गंभीर जखमी, मेलबन कसोटीत कॉम्बिनेशन बदलणार?

Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का

अधिक पाहा..

Comments are closed.