केएल राहुलवर KKR ची नजर! आयपीएल 2026 ट्रेड डीलवर मोठा खुलासा समोर

इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे, पण त्याआधीच खेळाडूंच्या अदला-बदलीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताचे स्टार फलंदाज केएल राहुल आणि संजू सॅमसन (KL Rahul & Sanju Samson) आपली जुनी टीम सोडून नवीन फ्रँचायझीत सामील होऊ शकतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स संघ राजस्थान रॉयल्स (RR) सोबत मोठी ट्रेड डील करण्यास तयार आहे.
तसेच, केएल राहुलला खरेदी करण्यासाठी शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघालाही उत्सुकता आहे.

आयपीएल 2025 मध्ये केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, पण त्याने स्वतःला कर्णधार पदापासून दूर ठेवले, जेणेकरून तो फक्त आपली फलंदाजी सुधारण्यात लक्ष देऊ शकेल. गेल्या हंगामात राहुलने 13 सामन्यांत सरासरी 53.9 ने 539 धावा केल्या.

रिपोर्ट्सनुसार, आता KKR संघ राहुलला आपल्या संघात घेऊ इच्छित आहे, ज्यामुळे त्यांना एक विकेटकीपर आणि एक ओपनिंग फलंदाज दोन्ही मिळतील.

संजू सॅमसन (sanju Samson) अनेक काळ राजस्थान रॉयल्ससोबत होता, पण आता त्याने स्वतः RR सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने RR ला स्वतःला रिलीज करण्याची विनंती केली आहे. रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स संजू सॅमसनला आपल्या टीममध्ये आणण्यासाठी राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेड डील करू शकते. दिल्लीने सॅमसनला घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण अद्याप ठरलेले नाही की, संजूच्या बदल्यात राजस्थानला कोणता खेळाडू दिला जाईल. तरीसुद्धा, हे निश्चित आहे की, संजू सॅमसन IPL 2026 मध्ये नवीन संघात खेळताना दिसेल.

Comments are closed.