4 चौकार आणि 9 षटकारांसह संजू सॅमसनची तुफानी खेळी, शुबमन गिलचं स्थान धोक्यात?

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी जाहीर झालेल्या टीममध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळाली आहे, पण त्याचवेळी त्यांच्या जागेबाबत प्रश्नही उपस्थित होत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेत सॅमसन फलंदाजीत अपयशी ठरला होता. मात्र त्या सर्व टीकेला त्याने आता बॅटने योग्य उत्तर दिलं आहे. केरळ क्रिकेट लीग 2025 मध्ये शतक झळकावल्यानंतर सॅमसनने पुढच्या सामन्यातही तुफानी खेळी करत 89 धावा ठोकल्या. त्यामुळेच शुबमन गिलचा (Shubman gill) प्लेइंग 11 मधील पत्ता कट होऊ शकतो.

मागच्या सामन्यात सॅमसनने 51 चेंडूत 121 धावा ठोकल्या होत्या, ज्यात 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच लयीत पुढच्या सामन्यात त्रिशूर टायटन्सविरुद्ध त्याने 46 चेंडूत 89 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि तब्बल 9 षटकार ठोकले. सॅमसनच्या या खेळीमुळे कोची ब्ल्यू टायगर्सने 20 षटकांत 188 धावा केल्या. केवळ दोन डावांत सॅमसनने 16 षटकार ठोकले आहेत. केरळ लीगमध्ये तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्याला बाद करणं जवळपास अशक्य वाटतं आहे. प्रत्येक गोलंदाजावर तो भारी पडताना दिसत आहेत.

रिपोर्ट्सनुसार हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे सॅमसनऐवजी शुबमन गिलला सलामीला उतरवण्याचा विचार करत होते. अशा परिस्थितीत सॅमसनला बाकावर बसावं लागणार होतं. पण आता तो ज्या आक्रमक लयीत खेळत आहे, त्यामुळे त्याला बाहेर ठेवणं फार कठीण होणार आहे. त्यामुळेच उपकर्णधार असूनसुद्धा शुबमन गिलला प्लेइंग 11 मध्ये संधीसाठी वाट पाहावी लागू शकते. सलामी फलंदाज म्हणून अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) जागा आधीच निश्चित आहे.

Comments are closed.