Sandeep dikshit congress reaction on prithviraj chavan claim of arvind kejriwal aap winning delhi election 2025
निवडणूक आयोगाने दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची नुकतीच घोषणा केली. त्याची रणधुमाळी आता सुरू होईल, त्यापूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठे विधान केले आहे. यावर कॉंग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू झाले आहेत.
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची नुकतीच घोषणा केली. त्याची रणधुमाळी आता सुरू होईल, त्यापूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठे विधान केले आहे. यावर कॉंग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. (sandeep dikshit congress reaction on prithviraj chavan claim of arvind kejriwal aap winning delhi election 2025)
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. दिल्लीत कॉंग्रेस स्वतंत्ररित्या निवडणूक लढवते आहे. येथे 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. लोकसभेत इंडि आघाडी म्हणून एकत्र लढलेले आप आणि कॉंग्रेस या निवडणुकीत मात्र स्वतंत्ररित्या लढणार आहेत. सध्या दिल्लीत आपचे सरकार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल जिंकू शकतात, असे विधान कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण यांच्या या विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Congress Vs AAP : दिल्लीकरांना याचेच आश्चर्य वाटत असावे, ठाकरे गटाने का म्हटले असे?
त्यांच्या या विधानावरून दिल्ली कॉंग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे. आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून संदीप दीक्षित भडकले आहेत. चव्हाणांना जर ‘आप’मध्ये जायचे असेल तर ते कॉंग्रेस सोडून आपमध्ये जाऊ शकतात, असा टोला दीक्षित यांनी चव्हाणांना लगावला आहे.
– Advertisement –
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता कमी वेळ उरला आहे. यामुळे सध्या दिल्लीतील मैदान गरम आहे. एका बाजूला ‘आप’ला सपा आणि तृणमूलने पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसने आपला पाठिंबा देण्याचे नाकारत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील निवडणुकीत आप जिंकू शकते असे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.
यामुळे अरविंद केजरीवालांना आव्हान देणारे कॉंग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित भडकले आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता अशाप्रकारे जर बेजबाबदार विधाने करत असतील, तर काय करणार. त्यांना जर आम आदमी पक्ष चांगला वाटत असेल तर त्यांनी तिथे जावं, असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा – Sudden Baldness : अखेर बुलढाण्यातील त्या विचित्र आजाराचा शोध लागला…पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आला समोर
Comments are closed.