संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठ
संगमनेर निवडणूक 2025: संगमनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा ‘नातेवाईक विरुद्ध नातेवाईक’ अशी अभूतपूर्व लढत रंगणार असून दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या प्रतिष्ठेलाच थेट धक्का बसणार आहे. विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पत्नी मैथिली तांबे (Maithili Tambe) एका बाजूला, तर महायुतीचे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या भावजयी सुवर्णा खताळ (Suvarna Khatal) दुसऱ्या बाजूला रिंगणात उतरत असल्याने या दोन्ही आमदारांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
Sangamner Election 2025: बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
यात आणखी भर घालत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr Sudhir Tambe) यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या भगिनी दुर्गा तांबे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये (sangamner) तांबे–थोरात घराण्याचे राजकीय वर्चस्व, तांबे–खताळ संघर्ष आणि नातेवाईकीतील स्पर्धा अशा तिहेरी संघर्षाचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचा दशकानुदशकांचा प्रभाव असलेल्या संगमनेरमध्ये यंदा काँग्रेसने अधिकृत उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय हा आणखी एक महत्त्वाचा कलाटणीबिंदू ठरू शकतो. मात्र मंगळवारी (25 तारखेला) अर्ज मागे घेतल्यानंतरच खरे समीकरण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी ही संगमनेर सेवा समिती नावाने आघाडी करून निवडणूक रिंगणात असल्याने बाळासाहेब थोरात यांच्याच मतदारसंघात महाविकास आघाडी पक्षाचे चिन्ह घेण्याऐवजी नवीन चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Rahuri Election: राहुरीत बर्डे विरुद्ध मोरे विरुद्ध पवार
राहुरी नगराध्यक्षपदासाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चुरस तुफान वाढली आहे. त्यात सखाहरी शांताराम बर्डे, राहुल बर्डे, भाऊसाहेब मोरे (जनसेवा मंडळ), सुनील पवार (भाजपा), गुलाब बर्डे, बापुसाहेब माळी (वंचित), ईश्वर मासरे (शिंदे गट), मृणाल मोरे या अनेक गटांचे उमेदवार समोरासमोर आल्याने स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे दिसू लागली आहेत.
Rahata Election: राहातामध्ये गाडेकर विरुद्ध गाडेकर ‘घरातलीच लढत’
राहाता नगराध्यक्षपदासाठी ‘गाडेकर विरुद्ध गाडेकर’ अशी थेट घराण्यातील लढत रंगणार आहे. महायुतीकडून डॉ. स्वाधिन गाडेकर, महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर यांच्यासोबत ठाकरे गटाचे राजेंद्र पठारे, राष्ट्रीय जनमंच पक्षाचे बाळासाहेब गिधाड, आपचे रामनाथ सदाफळ, बसपचे अनिल पावटे, अपक्ष भानुदास गाडेकर व तुषार सदाफळ, असे एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.