आंतरधर्मीय प्रेमप्रकरणामुळे संगमनेर शहरात तणाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या खांडगाव संगमनेरमधील तरुण-तरुणीच्या आंतरधर्मीय प्रेमप्रकरणामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणातील तरुणीला पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव सोमवारी (दि. 9) संरक्षण दिले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणीला भेटण्याच्या निमित्ताने तिच्या नातेवाईकांची संख्या शहर परिसरात वाढू लागल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तरुण-तरुणीला खासगी वाहनातून अज्ञातस्थळी हलविले. मात्र, यावेळी पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपामुळे सुरुवातीला शहर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी गर्दी केली. काही वेळातच संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घालत संबंधित पोलिसांवर कारवाई करून त्यांची बदली करण्याची मागणी केली.

दरम्यान, तीन बत्ती चौकात काही नागरिकांनी रास्ता रोको करीत पुणे-नाशिक महामार्ग तसेच पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक रोखली. त्यामुळे तिन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, प्रवीण साळुंखे यांनी जमावाशी चर्चा केली.

Comments are closed.