सांगवी घुग्गी येथे भूगर्भातून गूढ आवाज, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथे दि.28 सप्टेबर रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटाला पहिला तर 8 वाजून 21 मिनिटाला दुसऱ्यांदा भूगर्भातून भूकंप सदृश गुढ आवाज आला. या भूगर्भातून येणाऱ्या गूढ आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री शांत वातावरणात असल्यामुळे आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू आला असल्याचे नागरिक सांगत आहेत.या आवाजामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक नागरिक चक्क रस्त्यावर येऊन थांबले असल्याचे दिसून आले.प्राथमिक अंदाजानुसार जमिनीखालील दाब, खडकांचे हलणे किंवा भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहामुळे असा आवाज होत असावा, असे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप नेमके कारण स्पष्ट झालेले नाही

Comments are closed.