सांगलीच्या तासगावजळ कार-दुचाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार, चार जखमी
सांगली अपघात: सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाचवा मैलजवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident News) झालाय. यामध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर चौघे जखमी झालेत. शिवाजी बापू सुतार, आशाताई शिवाजी पवार, आणि वैष्णव ईश्वर सुतार अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर स्वाती अमित कोळी, पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सुरज बलराम पवार आणि किशोर लक्ष्मण माळी अशी जखमींची नावे आहेत. मयत शिवाजी सुतार हे आपली पत्नी आशाताई व नातू वैष्णव यांच्यासह मिरज तालुक्यातील काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटून त्यांच्या बुर्ली या गावी पुन्हा निघाले होते. ते राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांना कारने समोरून ठोकरले. यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार रस्त्याकडेला पलटी झाल्याने कारमधील चौघे जखमी झाले. एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास गेले, अन् काळानं इजाजिवंत केला
मिळालेल्या माहितीनुसारव्हॅगनार मोटारमधील सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चौघे शिक्षक कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास गेले होते. स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वाती कोळी यांच्यासह अन्य तीन शिक्षक कडेपुर येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर कडेपूर येथून पाचवा मैल- तासगाव मार्गे पुढे सांगलीला जाण्यासाठी निघाले होते. तासगावच्या नजीक आल्यानंतर समोरुन येणारी दुचाकी व त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली एका द्राक्ष बागेत जाऊन पडली. अपघातात दुचाकी वरील दुचाकी चालक शिवाजी बापू सुतार- (वय-57), आशाताई शिवाजी सुतार- (वय -55), वैष्णव ईश्वर सुतार (वय -5, रा. बुर्ली ता. पलूस) हे तिघेही ठार झाले. तर, व्हॅगनार मधील पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी(रा.सांगलीवाडी) व अन्य एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींना तासगाव व सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. फक्त या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे?
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.