तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्नं अधुरंच राहिलं ; बापाच्या निर्दयी वागण्याने संताप, साधनाच्या मृत्यू
सांगली: नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील साधना धोंडिराम भोसले या हुशार विद्यार्थिनीने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षणाच्या मार्गावर पाऊल ठेवले होते. मात्र, सराव परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण आल्याने मुख्यध्यापक असलेल्या तिच्या वडीलांनी तिला अमानुषपणे मारहाम केली. या घटनेमध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना केवळ एका मुलीच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील अतीमहत्त्वाकांक्षा, पालकांचा दबाव आणि चुकीच्या अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक अन्याय अधोरेखित करणारी ठरली आहे. वडिलांच्या अशा विकृत वागण्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे, तर डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी साधना सर्वांना सोडून गेली याबाबत हळहळ देखील व्यक्त होत आहे.
साधनाला डॉक्टर व्हायचं होतं
साधना भोसले हिला दहावीत 95 टक्के मार्क मिळाले होते. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. त्यासाठी ती मनापासून तयारी करत होती; अभ्यास करत होती. परंतु एका चाचणी परीक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे शिक्षक पित्याने तिला बेदम मारहाण केली. पित्याने केलेल्या बेदम मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साधना शालेय जीवनात अभ्यासू होती. डॉक्टर होण्याच्या हेतूने तिने सराव परीक्षेची तयारीही मन लावून केली होती. मात्र, परीक्षेतील निकाल तिच्या अपेक्षांनुसार न लागल्याने ती खचली. याच वेळी तिच्या मनाला आधार देण्याऐवजी, “कमी गुण का मिळाले?” या विचारांनी तिला दोष देण्यात आला. विशेष म्हणजे, साधनाचे वडील हे स्वतः शिक्षक असून विद्यार्थ्यांना संघर्षातून मार्ग काढायला शिकवतात. परंतु आपल्या मुलीकडे शिक्षकाच्या भूमिकेने न पाहता केवळ कठोर पालकत्वाची भूमिका घेतल्याने तिचा बळी गेला. शिक्षणाच्या चुकीच्या धारणा, निकालांवरील अतीलक्ष आणि मुलांना अपयश सहन न करणारी मानसिकता या सर्वांचा दुर्दैवी परिणाम म्हणजे साधनाचा मृत्यू आहे.
उलट उत्तरानं बापाचा संताप नेमकं काय घडलं?
पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना? असं उलट उत्तर साधनाने दिल्याने संतापलेल्या बापाने अमानुष मारहाण केली या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडीतील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे.साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचं स्वप्न होतं. मात्र, तिला नीटच्या चाचणी परिक्षेत कमी मार्क मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्यापध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली होती.
घटनेमध्ये साधना गंभीर जखमी झाली होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्या दिवशी सकाळी तिचे वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेला. याप्रकरणी धोंडीराम भोसले याला आटपाडी पोलिसांनी अटक केलीये. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर पोटच्या लेकीला अशी अमानुष मारहाण करणाऱ्या बापाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.