विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून खून, कृष्णा नदीत फेकला मृतदेह; ईश्वरपूरमधील धक्कादायक घटना


सांगली क्राईम न्यूज : किरकोळ वादातून एका विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून तिच्याच मित्राने खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये (Ishwarpur, Sangli)  समोर आला आहे. खुनाच्या घटनेनंतर मैत्रिणीचा मृतदेह कृष्णा नदीत (Krishna River) टाकून संशयित थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. यामुळ पोलिसांची देखील चांगलीचं धावपळ उडाली आहे. रेस्क्यू करुन दुचाकी बाहेर काढण्यात आली आहे. तर मैत्रिणीच्या पार्थिवाचा शोध सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

वाळवा तालुक्यातील एका गावामध्ये पीडिता ही आपल्या दोन मुलींसह राहत होती. तिचे पती कर्नाटकात मजूरीचे काम करतात. तर पीडिता ही खासगी रुग्णालय, खानावळ सारख्या ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. ईश्वरपूर येथे रुग्णालयात काम करत असताना तरुणाची आणि पीडिताची ओळख झाली. यादरम्यान या दोघांच्या मधील मैत्री आणखी वाढली. या मैत्रीतून संशयित तरुण आणि विवाहित महिलेमध्ये पैशाची देवाण-घेवाण सुरु झाली होती. काही काळापासून या दोघांमध्ये पैशावरुन सतत वाद सुरू होते आणि या वादातून संशयित तरुणाने मैत्रीण असलेल्या विवाहित महिलेचे हत्या केल्याचा प्रकार आता समोर आला आहे.

मृतदेह शोधण्याचे काम सुरू

विशेष म्हणजे संशयीत तरुणानेच हत्या केलीची कबुली ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून दिली आहे. आपल्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याचं सांगत मृतदेह ताकारी येथील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पोत्यात भरून फेकून दिल्याचं सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत असून नदीच्या पात्रामध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.  दरम्यान शोध मोहिमेमध्ये संबंधित तरुणीची दुचाकी आढळून आली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली असून अधिक तपास ईश्वरपूर पोलीस करत आहेत.

किरकोळ वादातून विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून तिच्याच मित्राने खून केला

दरम्यान, किरकोळ वादातून विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून तिच्याच मित्राने खून केल्याच्या घटनेमुळं परिसरात संतापाची लाट आहे. आरोपीने हत्या करुन मृतदेह कृष्णा नदीत टाकला आहे. दरम्यान, मृतदेह शोधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, अद्याप मृतदेहाचा शोध लागला नाही.  या घटनेनंतर आरोपी थेट पोलीस स्टेशनमध्ये देखील हजर झाला आहे. पोलिसांनी तात्काळ या घटने प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीसांनी या प्रकरणाचा कसुन तपास देखील सुरु केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.