सासूच्या कर्करोगाच्या उपचारासाठी पैशांचा तगादा, शिवीगाळ.. तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime: राज्यभरातून नवविवाहित महिलांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कधी सासरच्या मंडळींकडून होणारा छळ तर कधी माहेरून पैसे आण्याचा तगादा लावल्याने होणारे हे प्रकार समोर येत असताना सांगलीतील इस्लामपूर शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय नवविवाहित अमृता ऋषीकेश गुरव हिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर तिच्या सासूला कर्करोग झाल्याने तिच्या उपचारासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, असा तगादा सासरच्या मंडळींकडून अमृतावर लावला जात होता. (Crime News) 

नेमकं घडलं काय?

सासूला कर्करोग झाल्याने माहेरून पैसे आण असा तगादा, यावरून अमृतावर सतत शाब्दिक आणि मानसिक छळ होत होता. पतीसह सासू, सासरे, नणंद आणि पतीचा मामा हे मिळून तिला शिवीगाळ करत पैशासाठी दबाव आणत होते, अशी तक्रार अमृताच्या आईने पोलिसांत दिली आहे. सततच्या या छळामुळे अमृताने अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. घटनेनंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.मृत अमृता आणि तिचा पती ऋषीकेश यांचा 11 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. संसाराच्या सुरुवातीलाच पैशासाठी त्रास दिला जाऊन जीव द्यावा लागल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अमृताची आई वंदना अनिल कोले यांनी इस्लामपूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, पती ऋषीकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. इस्लामपूर) आणि पतीचा मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव  या पाचजणांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून घटनेमुळे इस्लामपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विवाहित प्रेमी युगुलाची आत्महत्या

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातीलच हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण गावात आणखी एक धक्कादायक घटना घडली. येथे गजानन गव्हाळे (35) आणि उमा कपाटे (30) या विवाहित प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. दोघेही विवाहित असून वर्षभरापूर्वी प्रेमसंबंधामुळे गावातून पळून गेले होते. अलीकडेच ते पुन्हा गावात परतले, मात्र घरच्यांच्या विरोधामुळे दोघांनी एकत्र आत्महत्येचा निर्णय घेतला. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

Comments are closed.