Sangli Massive fire at a food warehouse in Pethnaka
सांगलीतील खाद्यपदार्थाच्या गोदामामध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. पेठनाका या परिसरात असलेल्या गोदामाला गुरुवारी (ता. 13 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सांगली : राज्यातील विविध भागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आता सांगलीतील खाद्यपदार्थांच्या गोदामामध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. पेठनाका या परिसरात असलेल्या गोदामाला गुरुवारी (ता. 13 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले असून या आगीने संपूर्ण गोदामाला आपल्या कचाट्यात घेतले आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. (Sangli Massive fire at a food warehouse in Pethnaka)
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील पेठनाका जवळील एका कारखान्यातील गोडाऊनला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे 6 वाजता आग लागण्यास सुरुवात झाली. ज्यानंतर आगीने संपूर्ण गोडाऊनला आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. परंतु, काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. ज्यामुळे आगीचे लोळ दिसू लागले आणि आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे संपूर्ण परिसर प्रभावित झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु, वाढत्या आगीमुळे अग्निशमन दलाला यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले.
ज्या गोडाऊनला आग लागली आहे, त्या ठिकाणावरील खाद्यपदार्थ हे परदेशात निर्यात केले जाते. परंतु, आता यामध्ये हे सर्व खाद्यपदार्थ जळून खाक झाले आहेत. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीटे वातावरण पसरले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दोन ते तीन तासांनंतर सुद्धा अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नव्हते.
हेही वाचा… Maharashtra Weather : राज्यात कुठे उकाडा, तर कुठे गारवा; मुंबईतील तापमानातही झाली घट
Comments are closed.