Sangli News – वादळी वाऱ्यासह पावसाने भिंत कोसळली; सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्याने दुर्घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेत शंकर आबा लोखंडे, मंगल भाऊसो, संजूबाई राम चौधरी, कोंडीबा गेजगे यांच्यासह आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Comments are closed.