आधी सानिया मिर्झाला सोडलं, आता तिसऱ्या बायकोलाही दिला घटस्फोट? शोएब मलिकच्या वैवाहिक जीवनात नवा
शोएब मलिक तिसरी पत्नी सना जावेद घटस्फोटाच्या बातम्या: मागच्या वर्षी भारतीय टेनिसची दिग्गज खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलिकने लगेचच पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले. आता मात्र सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की, शोएब मलिक सना जावेदलाही (Sana Javed Divorce) घटस्फोट देणार आहे.
काय आहे प्रकरण?
शोएब मलिकने 2024 मध्ये सना जावेदसोबत लग्न केले होते. दोघे एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये एकत्र दिसले आणि त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. लवकरच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सानियाशी लग्नापूर्वी शोएबचे पहिले लग्न आयशा सिद्दीकीसोबत झाले होते, ते तब्बल आठ वर्षे टिकले. नंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि काही काळातच शोएब व सानिया यांनी हैदराबादमध्ये विवाह केला.
मात्र 2024 मध्ये सानियाने शोएबकडून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर त्याने सना जावेदसोबत लग्न केले. सांगितले जाते की, शोएबच्या तिसऱ्या लग्नाला त्याचे कुटुंब उपस्थित नव्हते. यावर्षीच्या सुरुवातीला शोएबची बहीण हिने खुलासा केला होता की, सानियाने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला कारण ती त्याच्या अफेअर्समुळे कंटाळली होती.
आता का सुरू झली चारचा? (शोएब मलिक तिसरी पत्नी सना जावेद घटस्फोटाची बातमी)
अलीकडेच एका कार्यक्रमात शोएब आणि सना जावेदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांपासून खूप लांब बसलेले होते आणि त्यांच्यात कसलीही संवाद झाला आहे. यावरून नेटिझन्स असा अंदाज वर्तवत आहेत की याचे नाते तुटले आहे.
फॅन्सचे रिअॅक्शन काय?
या व्हायरल व्हिडिओवर सानिया मिर्झाच्या चाहत्यांनी शोएब मलिकला चांगलेच धारेवर धरले आहे. एका फॅनने लिहिले, “दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून कुणाला कधी सुख मिळात नाही?” तर दुसऱ्याने कमेंट केली, “कुणाचं घर उद्ध्वस्त करून स्वतःचं कसं काय वसवणार?” सध्या फक्त फॅन्सच्या प्रतिक्रिया आणि व्हिडिओवरूनच ही चर्चा रंगली आहे. या प्रकरणी शोएब मलिक किंवा सना जावेद यांच्याकडून अजून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.