Sanjay Gaikwad made serious allegations calling Maharashtra Police inefficient
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. मात्र आता त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना अकार्यक्षम म्हणत गंभीर आरोप केले आहेत.
बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे एका सत्कार सोहळ्यात मतदारांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला. इतकेच नाही, तर त्यांनी मतदारांना शिवीगाळ सुद्धा केली होती. यानंतर आता त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना अकार्यक्षम म्हणत गंभीर आरोप केले आहेत. (Sanjay Gaikwad made serious allegations calling Maharashtra Police inefficient)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 27 एप्रिल रोजी बुलढाणा येथे आभार सभेसाठी येणार आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आज (25 एप्रिल) संजय गायकवाड यांनी त्यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयात एक पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत संजय गायकवाड यांना शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आम्हालाही धमक्या येतात. समाजात चांगलं काम करत असाल तर धमक्या येणारच. पण याबाबतीत पोलीस वाले काही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोरची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला, त्यात पोलिसांनी काही केले नाही, असे म्हणत त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.
हेही वाचा – Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या सय्यद शाहच्या कुटुंबाला शिंदेंकडून मदतीचा हात
संजय गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात. सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढतो. गुटखाबंदी आणि दारूबंदी केली तर, पोलिसांचा एक-एक हप्ता वाढतो. बुलढाण्यातील दोन पोलीस चोरांचे सरदार आहेत. चोरीचा माल त्यांच्या घरात आढळतोच कसा? असा प्रश्न उपस्थित करत संजय गायकवाड म्हणाले की, पोलिसांनी जर इमानदारपणे काम केले तर जगातली सगळी घाण साफ होईल. पोलिसांनी फक्त सद्रक्षणाय खलनिग्रहाय या त्यांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे काम केले पाहिजे, असेही संजय गायकवाड म्हणाले.
हेही वाचा – Panvel Tourist : दु:ख, भीती, तणाव अन् श्रीनगरमधून थेट मुंबई, निसर्ग पर्यटनचे 35 प्रवासी पनवेलला पोहोचले
Comments are closed.