चोरांनी अडवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’, रुळावरील सामान पळवल्याने आगमनाला विलंब

बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी या मिनी ट्रेनची बच्चे कंपनीला प्रतिक्षा आहे. तिच्या चाचण्याही सुरू आहेत. लवकरच ती ट्रॅकवरही येऊ शकेल पण तिच्या आगमनात चोरांनी खोडा घातला आहे. रुळावरील सामान चोरटय़ांनी पळवल्याने वनराणी रुळावरून घसरण्याचा धोका लक्षात घेऊन तिची सखोल तपासणी करण्यात येत आहे.
वन्य प्राण्यांपासून धोका पोहोचू नये म्हणून उद्यानात मिनी ट्रेन सुरू करण्यात आली होती. परंतु ती नादुरुस्त झाल्याने नवी पर्यावरणपूरक वनराणी यंदा उद्यानात दाखल झाली. जुलै महिन्यात तिला रुळावर उतरवण्यात आले. दिवाळीत ती पूर्ण क्षमतेने चालू करण्याचाही प्रशासनाचा विचार होता. पण उद्यानातील पाडय़ांमधील लोकांनी रुळावरील लोखंडी खिळे, क्लिप्स चोरून नेल्याने त्या स्थितीत वनराणीला ट्रकवर चालवणे कठीण झाले आहे.
दादर पश्चिम येथील स्टार मॉलजवळील मॅकडॉनल्ड्सच्या किचनमध्ये आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणचे ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रिक साधने आणि वायरिंगमुळे आग काही वेळातच भडकली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही.

Comments are closed.