IND vs ENG: रविंद्र जडेजाबद्दल संजय मांजरेकरांच वक्तव्य, उणीव सांगत साधला निशाणा!
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचं नातं काही चांगलं नाही. मांजरेकरांनी काही वेळा जडेजावर मोकळेपणाने टीका केलेल्या आहेत, ज्याला जडेजाने त्याच्या अंदाजात प्रत्युत्तर देखील दिलेले आहे. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा जडेजा विषयी मांजरेकरांचं कोणतंही वक्तव्य समोर येतं, तो चर्चेचा विषय बनतोच.
इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्याच्या सुरुवाती आधी माजी खेळाडू संजय मांजरेकर (Former cricketer Sanjay Manjrekar) यांनी जडेजाच्या इंग्लंडच्या फलंदाजांविरुद्ध असलेल्या कमजोरीबद्दल भाष्य केले आहे. संजय मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटले, जडेजाच्या काही चुकीच्या गोष्टी अडचणी ठरतील. ते म्हणाले, मी इंग्लंडच्या फलंदाजांविरुद्ध तो फेल ठरेल या गोष्टीबद्दल बोलत आहे.(Test series IND vs ENG)
इंग्लंडमधील फलंदाजांनी जडेजाचा भारतामध्ये देखील सोप्या पद्धतीने सामना केला होता. जो चिंतेचा विषय आहे. मांजरेकरांनी म्हटले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये जडेजा सोबत कुलदीप यादवला (Kuldeep yadav) देखील संधी मिळायला हवी. इंग्लंडमध्ये शेवटच्या भारतीय दौऱ्यावर जडेजा काही प्रभावी लयीमध्ये दिसला नव्हता. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने फक्त 19 विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडच्या मैदानावर जडेजाचे रेकॉर्ड काही खास राहिलेले नाही. 21 डावांमध्ये त्याच्या नावावर फक्त 21 विकेट्स आहेत. पण त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. जडेजाने बाहेरच्या मैदानावर एकूण 30 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 49 डावांमध्ये त्याने 80 विकेट्स घेतलेल्या आहेत.
तसेच घरेलू मैदानात 97 सामन्यांमध्ये त्याने 238 विकेट्स घेतल्या आहे. जडेजा काही मागच्या काही काळापासून फॉर्मच्या बाहेर दिसत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये तो काही प्रभावी कामगिरी करताना दिसत नाही. भारतीय संघ व्यवस्थापन यावेळी जडेजाकडून चांगल्या प्रदर्शनाची आशा करत असेल. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघामध्ये जडेजा सर्वात अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्यावर महत्त्वाची कामगिरी करण्याची जबाबदारी असेल.
Comments are closed.