Sanjay raut angry over sharad pawar 7 mp contant sunil tatkare offer join ajit pawar ncp-ssa97


Sanjay Raut On Ajit Pawar Ncp : ‘ईव्हीएम’च्या माध्मयातून तुम्ही विधानसभा जिंकली आहे. तरी, तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील 7 खासदारांना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर खासदार सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळे वगळता 7 खासदारांना तटकरेंनी वैयक्तिक भेटी घेऊन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. यानंतर संतापलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “जोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार फोडण्यात येत नाहीत, तोपर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. ‘केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी जो खासदारांना कोटा आहे, तो तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी तुम्ही शरद पवारांच्या पक्षातील 6 ते 7 खासदार आणि तुमचे एक खासदार सुनील तटकरे,’ असे आकडा पूर्ण होईल, तेव्हा केंद्रात मंत्रिपद मिळेल, असं पटेलांना सांगण्यात आलं आहे.”

– Advertisement –

हेही वाचा : शरद पवारांच्या 7 खासदारांना तटकरेंकडून अजितदादांकडे येण्याची ऑफर? सुळेंचा पटेलांना फोन अन्…

“प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचे आहे, म्हणून शरद पवारांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न कसोसीनं सुरू आहे. हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. ‘ईव्हीएम’च्या माध्मयातून तुम्ही विधानसभा जिंकली आहे. तरी, तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही. याचे-त्याचे खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी फोडाफोडी सुरू आहे. देशात तुम्ही काय चालवलं आहे?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

– Advertisement –

तुमचे आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं, याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “किती आमदार-खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, यांची नावे त्यांनी जाहीर करावी. आमचाही त्यांच्या गटाशी संपर्क आहे, असं मी बोललो तर? पण, मी बोलणार नाही. आज त्यांच्याकडे सत्ता आहे. दिल्लीत राक्षस बसलेले आहेत. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय आणि पैसा आहे. त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे.”

हेही वाचा : शिंदेंमुळे युती फिस्कटली, मनसे नेत्यांचा बैठकीत संताप; मनपा निवडणुकीत ठाकरे भाजपला टाळी देणार?

 



Source link

Comments are closed.