… तर पंतप्रधानांनी छातीठोकपणे सांगावे की गोळवलकर गुरुजींनी जे लिहलंय ते चुकीचं आहे, संजय राऊत यांचे मोदींना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनात छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम आणि बलिदानाची गाथा सांगणाऱ्या सिनेमाचे कौतुक केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना गुरू मानतात त्या गोळवलकर गुरुंजींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात लिखान केले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना एक आव्हान केले आहे.

”छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत गोळवलकर गुरुजींनी जी भूमिका मांडलीय ती मोदींनी ऐकली पाहिजे. त्यानंतर मोदीजींनी छातीठोकपणे सांगितलं पाहिजे की गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे लिहलंय ते चुकीचं आहे व त्यांचा निषेध करायला हवा”, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.

”प्रधानमंत्र्यांची काय विचारधारा आहे ती सांगू शकत नाही. नुकताच एक चित्रपट बनला आहे. जेव्हा एक ऐतिहासिक फिल्म बनते तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता त्यातून सत्य समोर आणायचा प्रयत्न करतो. मोदींनी गेल्या दहा वर्षात अनेक चित्रपटांचे त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी मार्केटींग केलेय. कश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स, अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर, अशा चित्रपटांना प्रमोट करण्याचे काम भाजपने केलेय. छावा चित्रपटाच्या निर्माणात मोदीजींचे व भाजपचे काहीही योगदान नाही. या चित्रपटाच्या शेवटच्या भागावरून लोकं भावूक झाले आहेत. तेच पाहून मोदीजींनी पंतप्रधान म्हणून नाही तर राजकीय नेते म्हणून यात उडी मारली. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत गोळवलकर गुरुजींनी जी भूमिका मांडलीय ती मोदींनी ऐकली पाहिजे. त्यानंतर मोदीजींनी छातीठोकपणे सांगितलं पाहिजे की गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे लिहलंय ते चुकीचं आहे व त्यांचा निषेध करायला हवा. कारण छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.