Sanjay Raut asserted right of Thackeray group to post of Leader of Opposition in Maharashtra Assembly


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राऊतांनी या पदावर ठाकरे गटाचाच हक्क असल्याचे म्हटले आहे.

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार, आमदारांची बैठक घेण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली असून आता खासदारांची बैठक आज शनिवारी (ता. 01 मार्च) घेण्यात येत आहे. या बैठकीच्या आधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राऊतांनी थेटपणे या पदावर आमच्या पक्षाचा हक्क असल्याचे प्रसार माध्यमांसमोर म्हटले आहे. त्यामुळे याबाबत आता महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut asserted right of Thackeray group to post of Leader of Opposition in Maharashtra Assembly)

नाशिक येथे प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, काल आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची बैठक आहे. कारण उद्यापासून विधानसभेचे अधिवेशन आहे. साधारणतः आठ दिवसांनी संसदेचे (राज्यसभा आणि लोकसभा) अधिवेशन आहे. त्यासंदर्भात आमदारांना, खासदारांना एक दिशा मिळावी, याकरिता अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठक संसदीय प्रमुख घेत असतात. तशी कालही बैठक घेण्यात आली. नक्कीच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना ठाकरे गट आपला दावा असे म्हणणार नाही पण आपला हक्क सांगणार आहे, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Shivsena UBT : शिवसेना ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेते पदावर दावा, होतेय या नावाची चर्चा

तर, आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमांत आणि घटनेत असे कुठेही म्हटले नाही की, विरोधी पक्षनेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेचे 20 चे बळ आहे. याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्षनेते पद मिळालेले आहे. आमची एकत्रित संख्या 50 च्या वर आहे. त्यामुळे सरकारने खासकरून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना घटना, संविधान, लोकशाही याविषयी नक्कीच जाण असावी आणि असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत आमची विरोधी पक्षनेतेपदाची जी भूमिका आहे, ती मान्य करतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या विधानावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Comments are closed.